बामणोदला 21 वर्षीय तरुणाची आत्महत्या

0

यावल : तालुक्यातील बामणोद येथे 21 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी 12 वाजता उघड झाली. राहुल प्रमोद सोनवणे असे मृताचे नाव आहे. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. बामणोद गावातील कोळीवाड्यातील रहिवासी आणि सध्या भालोद महाविद्यालयात प्रथम वर्ष कला शाखेत शिक्षण घेणारा विद्यार्थी राहुल सोनवणे याने मंगळवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास भालोद-हिंगोणा रस्त्यावर विष्णू वाघुळदे यांच्या शेतातील निंबाच्या झाडाला साडीने गळफास घेतला. घटनास्थळी उपसरपंच दिलीप भालेराव, हवालदार किरण चाटे, उमेश सानप यांनी धाव घेतली. या संदर्भात फैजपूर पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार किरण चाटे, उमेश सानप करीत आहेत.

Copy