BIG BREAKING: बाबरी मशीद प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

0

लखनौ: १९९२ मध्ये बाबरी मशीद पाडल्याच्या प्रकरणी विशेष सीबीआय न्यायालय आज बुधवारी ३० रोजी निकाल दिला. ऐतिहासीक असा हा खटला आहे. लखनौ विशेष सीबीआय न्यायालयात सुनावणी झाली. या ऐतिहासिक खटल्यातील सर्व आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. २८ वर्षापूर्वीच्या या खटल्याचे निकाल लागले आहे. ३२ आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. लखनौ सीबीआय कोर्टात आज ऐतिहासिक सुनावणी झाली. निकाल लागल्यानंतर देशभरात जल्लोष साजरा करण्यात येत आहे. विहिप, आरएसएससह राजकीय पक्ष आणि हिंदुवादी संघटनेकडून आनंदोत्सव साजरा होत आहे.

विश्वहिंदू परिषद, आरएसएस, भाजपचे काही नेत्यांनी मिळून बाबरी मशीद पडल्याचे आरोप करण्यात आले होते. पूर्वनियोजित कट रचून बाबरी मशीद पाडण्यात आल्याचे आरोप करण्यात आले होते. या प्रकरणात लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती  यांच्यासह ३२  आरोपी होते. सर्वांची निर्दोष मुक्तता झाली आहे.

आजच्या सुनावणीत बाबरी मशीद पाडण्याचा पूर्वनियोजित कट नव्हते असा महत्त्वाचा निकाल दिला आहे. आरोपींना दोषी ठरविण्यासाठी  सीबीआयकडून आवश्यक पुरावे सादर करता आलेले नाही असा निकाल कोर्टाने देत सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. सबळ पुरावे देण्यात सीबीआय कमी पडली असा ठपका कोर्टाने ठेवला आहे.

Copy