बापरे…जिल्ह्यात ३१९ नवीन कोरोना रुग्ण

0

जळगाव: जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. आज सोमवारी पुन्हा कोरोना रूग्णसंख्येत मोठी वाढ झाली. नव्याने ३१९ रूग्ण आढळुन आले आहेत. यात जळगाव शहरातील सर्वाधिक रूग्णांचा १५८ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण ५८ हजार ८५४ बाधितांची नोंद झाली आहे. इतर तालुक्यांमध्ये जळगाव ग्रामीण ०६, भुसावळ १२, अमळनेर २०, चोपडा १८, पाचोरा ४, भडगाव ७, धरणगाव ४, यावल ४, जामनेर ४, पारोळा १, चाळीसगाव ७१, मुक्ताईनगर ७ आणि इतर जिह्यातील ३ असे एकूण ३१९ रुग्ण आढळून आले आहे. दिवसभरात जळगाव शहरातील १ भुसावळ तालुक्यातील २ आणि चाळीसगाव तालुक्यातील १ असे एकूण चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Copy