बाधित डॉक्टरमुळे कोरोनाबाधेची लक्षणे जगासमोर

0

माद्रिद : स्पेनमधील डॉक्टर येल तुंग चेन (वय 35) यांना कोरोनाची बाधा झाली असून, या विषाणूची बाधा होण्यापूर्वीच्या टप्प्यांची माहिती आज त्यांच्यामुळे जगासमोर येत आहे. माद्रिद येथील वैद्यकीय विद्यापीठाच्या रुग्णालयात करोनाबाधितांवर उपचार करताना त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. डॉक्टर चेन दररोज आपल्या प्रकृतीबाबत माहिती ट्विटरवर देत आहेत. आपल्या फुफ्फुसांचा अल्ट्रासाउंड स्कॅन केल्यानंतर डॉक्टर येन दररोज आजाराची लक्षणे सांगत आहेत.

पहिला दिवस : घसा खूपच खवखवत होता. डोकेदुखीचा खूप त्रास झाला. सुखा खोकलाही येत होता. मात्र, श्वास घेण्यात कोणताच त्रास झाला नाही, दुसरा दिवस: घसा खवखवणे तसेच, कफाचा त्रासही कमी झाला. डोकेदुखी कमी झाली. श्वास घेण्यात अथवा छाती दुखण्याची कोणतीही लक्षणे नव्हती. तिसरा दिवस ः डोकेदुखी व घसा खवखवत नव्हता. कफाचा त्रास होत होता. पण श्वास घेण्यास त्रास होत नव्हता व छातीत दुखत नव्हते. जुलाब सुरू झाले असले तरी त्याचे प्रमाण कमी होते. चौथा दिवस ः कफ खूप झाला. प्रचंड थकवाही जाणवत होता. छातीत दुखत नव्हते. कोरोनाची लागण झाली असल्याचा संशय. वैद्यकीय चाचणी केली असता, कोरोनाची बाधा असल्याचे समोर.

Copy