बाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक

0

जळगाव – जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच आहे. जिल्ह्यात शनिवारी सलग तिसर्‍या दिवशी 19 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून यात सर्वाधिक मृत्यू झालेले आठ बाधित हे जळगाव शहरातील आहेत. जिल्ह्यात नव्याने 742 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून एकूण रुग्णसंख्या 43 हजार 301 झाली आहे. शनिवारी सर्वाधिक 196 रुग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहेत. दुसरीकडे 833 रुग्ण हे कोरोनामुक्तही झाले आहेत.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून कमी होण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. एकीकडे रुग्णसंख्या तर दुसरीकडे बाधीतांचा मृत्यू यामुळे परिस्थिती चिंताजनक आहे. जिल्ह्यात शनिवारी नव्याने 703 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. यात जळगाव शहर 196 , जळगाव ग्रामीण 10, भुसावळ 60, अमळनेर 56, चोपडा 58 , पाचोरा 10, भडगाव 2, धरणगाव 43, यावल 21, एरंडोल 7, जामनेर 25, रावेर 23, पारोळा 115, चाळीसगाव 64, मुक्ताईनगर 18, बोदवड 24 इतर जिल्ह्यातील 10 याप्रमाणे रुग्णसंख्या आहेत. दिवसभरात 19 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहर 8 , पाचोरा तालुक्यात 3 , अमळनेर, चोपडा, जामनेर तालुक्यात प्रत्येकी 2 तर चाळीसगाव, आणि भुसावळ तालुक्यात प्रत्येकी एका बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

Copy