बाजारपेठ पोलिसांनी घेतला 17 बेवारस दुचाकींचा ताबा

0

दुचाकी मालकांबाबत होणार चौकशी

भुसावळ : रेल्वे स्थानकाच्या पार्किंगमध्ये गेल्या काही वर्षांपासून बेवारसरीत्या पडून असलेल्या 17 दुचाकींचा शनिवारी बाजारपेठ पोलिसांनी ताबा घेतला. अनेक ग्राहक दुचाकी लावल्यानंतर परत घेण्यासाठी आलेच नसल्याने वर्षानुवर्षे या दुचाकी पडून असल्याने त्या सडण्याच्या मार्गावर आल्या आहेत शिवाय या दुचाकी चोरीच्या आहे की अन्य कुणाच्या याबाबत आता बाजारपेठ पोलिस परीवहन विभागाला गाडीच्या चेचीस व इंजिन क्रमांकावरून पत्र देवून संपर्क साधणार आहे. मूळ मालक या गाडींचे न सापडल्यास नियमानुसार या गाडींचा लिलावदेखील करण्यात येणार आहे.

लोहमार्ग पोलिसांनी सोपवल्या १७ दुचाकी

जिल्ह्यात सुरू असलेल्या मोटरसायकल चोरीच्या सत्रामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या अधिकार्‍यांना चौकशी करण्याचे आदेश दिल्याने सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी यांनी रेल्वे स्थानकावरील सायकल स्टॅण्डवर चौकशी केली असता 17 बेवारस मोटरसायकल ताब्यात घेण्यात आले. परीवहन विभागाकडे मोटरसायकल मालकांचे नावाची माहिती घेऊन त्यांना सूचना देण्यात येणार आहे तसेच चोरीला गेलेल्या काही मोटरसायकलींचा या माध्यमातून शोध लागण्याची शक्यता आहे.