‘बाजार’चा ट्रेलर लाँच

0

मुंबई : बॉलिवूडचा नवाब सैफ अली खानने ‘सेक्रेड गेम्स’ या वेबसीरिजमधून अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली. आता त्याचा आगामी ‘बाजार’ चित्रपट भेटीला येत आणि चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे.

‘बाजार’ चित्रपट शेअर मार्केटवर आधारित आहे. यात मराठमोळी राधिका आपटे आणि चित्रांगदा यांचीदेखील या चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे. याआधी राधिका सैफसोबत ‘सेक्रेड गेम्स’मध्ये झळकली होती.

चित्रपट समीक्षाकार तरण आदर्श यांनी या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. चित्रपटात सैफ एका शेअर ब्रोकरची व्यक्तीरेखा साकारणार आहे.