Private Advt

बांभोरीनजीक डंपरवर बस आदळली

जळगाव : राष्ट्रीय महामार्गावर पुढे जात असलेल्या डंपरवर मागून येणारी एस.टी.बस आदळून झालेल्या अपघातात बसमधील पाच प्रवासी किरकोळ जखमी झाले. हा अपघात बांभोरी गावाजवळ असलेल्या पोद्दार शाळेसमोर बुधवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास घडला. अपघातानंतर दोन तास वाहतूक ठप्प झाली होती.

डंपरवर मागून आदळली बस
जळगाव-एरंडोल राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या बांभोरी गावाजवळील पलोड स्कूलजवळ पुढे जात असलेल्या डंपरला मागून येणारी जळगाव आगाराची बस (क्रमांक एम.एच.20 बी.एल.764) ही जळगावकडून शिंदखेडा शहराकडे निघाली असताना धडकली. यात चालकाच्या डाव्या बाजूवरील बसचे नुकसान झाले तर प्रवास करणारे पाच ते सात प्रवासी किरकोळ जखमी झाले. जखमींची नावे कळू शकली नाही. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान, अपघातामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली. तब्बल दोन तासानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. यावेळी शहर वाहतूक शाखा, जळगाव तालुका पोलिस ठाण्याचे पथक आणि पाळधी दुरक्षेत्र विभागाचे पोलिस कर्मचार्‍यांनी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.