बांधकामाच्या ठिकाणाहून इलेक्ट्रीक मोटर चोरीला

0

जळगाव – शहरातील देवेंद्रनगर परिसरात असलेल्या नवीन इमारतीचे बांधकाम करण्याच्या ठिकाणावरून इलेक्ट्रीक मोटर चोरून नेल्याप्रकरणी वॉचमनवर रामानंद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, चारूलता राजेंद्र बोरसे रा. बोरसे यांचे देवेंद्रनगर भागात नवीन प्लॉटवर इमारतीचे काम सुरू आहे. या इमारतीजवळ वॉचमन म्हणून सियाराम मोरे मुळ रा.मध्यप्रदेश हा पहारेकरी होता. त्याला सांगून इमारतीचे मालक कुटुंबासह मुंबईला 30 सप्टेंबर रोजी गेले. आज सकाळी घरी आल्यावर वॉचमनकडून समजले की, बांधकामच्या ठिकाणाहून 6 हजार रूपये किंमती टेक्समो कंपनीची इलेक्ट्रीक मोटार चोरीस गेली. याबाबत वॉचमनचीच चौकशी केली असता वॉचमन उडवाउडवीचे उत्तर देत होता. त्याला घरी बोलावले असता तो न आल्याने ही इलेक्ट्रीक मोटर वॉचमननेच चोरी केल्याचे समजते. यावरून घरमालक चारूलता बोरसे यांच्या फिर्यादीवरून सिंयाराम मोरे याच्यावर संशय असल्याने त्यांच्याविरोधात रामानंदनगर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Copy