Private Advt

बांधकामाचे साहित्य चोरणारे चौघे अटकेत; दोन दिवसांची सुनावली कोठडी

जळगाव । जळगाव-औरंगाबाद रस्त्यावरील बांधकामाच्या साइटवरुन चोरट्यांनी बांधकामाचे साहित्य 13 जून रोजी पहाटे 5 वाजेच्या सुमारास लांबविले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी चार संशयित आरोपींना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, चारही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
जळगाव- औरंगाबाद या रस्त्याचे काम स्पैरोधारा इन्फास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने घेतले आहेत.
रस्त्याचे सद्यस्थिती एमआयडीसीतील मानराज मोटर शोरुमजवळ लहान पुलाचे काम सुरू आहे. या ठिकाणाहून 13 जून रोजी पहाटे बांधकामाचे साहित्य चोरटे रिक्षातून घेऊन गायब झाले होते. वॉचनमने पाठलाग के ला. मात्र, ते पसार झाले. चोरट्यांनी या ठिकाणाहून 50 हजारांच्या 10 लोखंडी प्लेट, दोन हजार 700 रुपयांचे नऊ युजॅक, एक हजार 800 रुपयांचे तीन एम.एस.पाइप, 40 हजार रुपये किमतीचे 10 क्रिप्स असे बांधकामाचे साहित्य लंपास केले होते. याबाबत कंत्राटदार शेख रफिक शेख रऊफ यांनी फिर्याद दिली. त्यावरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. बांधकामाचे चोरीचे साहित्य सागर फुलचंद जाधव (वय 19, रा. रामेश्‍वर कॉलनी) व धीरज जगदिश ठाकूर (वय 21, रा. श्रीकृष्णनगर) हे विक्री करण्यासाठी सुप्रिम कॉलनीतील भंगाराच्या दुकानावर येत असल्याची गोपनीय
माहिती पोलिसांना कळाली. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी सहकार्‍यांशी चर्चा केली. शिकारे यांनी सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, किशोर पाटील, चेतन सोनवणे, मुकेश पाटील, सुधीर साळवे, असीम तडवी, मुदस्सर काझी, सचिन पाटील यांचे पथक तयार करण्यात आले. या पथकाने सागर जाधव आणि धीरज ठाकूर यांंना चोरीचा माल विक्री करताना रंगेहाथ पकडलेे. त्यांनी चोरीचे साहित्य सुप्रीम कॉलनी व आर.एल.चौफुली परिसरातील भंगार व्यावसायिकांना विक्री केल्याची कबुली दिली. पो लिसांनी पुनर्वासी प्रल्हाद पासवान (वय 40, रा.आनंद बॅटरी शेजारी, गोपाल दाल मिल समोर, एमआयडीसी) व इम्रान सादीक खाटीक (वय 30, रा. मोहम्मदियानगर, गुलाब बाबा कॉलनी) याभंगार व्यावसायिकांना देखील अटक केली.