बांगड्या देण्यासाठी पाठवला चेक

0

नवी दिल्ली । सुकमा येथे नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 25 जवान शहीद झाले. यामुळे व्यथित झालेल्या माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू अजित वर्मा यांनी थेट पंतप्रधानांना बांगड्या भेट देण्यासाठी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री इराणींना पत्र लिहिले. याआधी पंतप्रधान मनमोहन सरकार सत्तेत असताना सन 2013 ला नक्षलवादींचा हल्ला झाला होता. त्यावेळी आपण तत्कालीन पंतप्रधानांना बांगड्या देण्याचा मनोदय व्यक्त केला होता. या पत्रासोबत माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू अजीत वर्मा यांनी 1000 रुपयांचा चेकही पाठवला.