बहुमतासाठी भाजपाची मदत घेणार नाही

0

नवी दिल्ली । उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत बहुजन समाज पक्ष बहुमत मिळवेल. पण, बहुमतासाठी संख्या कमी पडल्यास भाजपची मदत कधीच घेणार नाही, असे बसपाच्या प्रमुख मायवती यांनी म्हटले आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पाश्‍वर्र्भूमीवर मंगळवारी कानपूर येथे मायावती यांची सभा झाली. या सभेमध्ये मायवती यांनी भाजपसोबत बसपा सरकार स्थापन असल्याच्या वृत्ताचे खंडन करत असे कधीच होणार नाही, असे म्हटले आहे.

मायावती म्हणाल्या, भाजपकडून सोशल मीडियामध्ये बसपासोबत सरकार स्थापन करत असल्याची अफवा पसरविण्यात येत आहे. पण, असे कधीच होऊ शकत नाही. मला पूर्ण विश्‍वास आहे, की बसपाला उत्तर प्रदेशात बहुमत मिळेल. त्यामुळे भाजप किंवा समाजवादी पक्ष-काँग्रेस आघाडीला पाठिंबा देण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही.

बसपाच एक नंबरवर असेल
बहुमत न मिळाल्यास आम्ही विरोधात बसू, पण भाजपला पाठिंबा देणार नाही. बसपाच नंबर एकचा पक्ष राहील. पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर भाजप अध्यक्ष अमित शहा यांची झोप उडाली आहे.