बहुजनांच्या महानायिकांचा जागर उत्साहात साजरा

0

चाळीसगाव येथील समाज प्रबोधिनी बहुउद्देशीय संस्थाचा उपक्रम
चाळीसगाव – येथील समाज प्रबोधिनी बहुउद्देशीय संस्था चाळीसगावचे महात्मा फुले लाईफ अॅण्ड मिशन सेंटर, महात्मा फुले नगर, जुने विमानतळ येथे रविवारी १४ ऑक्टोबर २०१८ रोजी ‘येवला येथिल धम्म अभ्यास सहल’चा अनुभव कथन महिलावर्गाने मनोगतात व्यक्त केले. असाच उपक्रम सतत राबविण्यात यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्रा.गौतम निकम यांनी प्रस्ताव मांडला “बहुजनांच्या महानायिकांचा जागर” साजरा करण्यात यावा, या प्रस्तावाला महिला वर्गाने प्रचंड प्रतिसाद दिला. 14 ते 18 ऑक्टोबर रेाजी रात्री ८ ते १० पर्यंत बहुजनांच्या महानायिकांचा जागर हा कार्यक्रम महिलांनी महिलांसाठी त्यांच्यातील कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठीचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाचे संयोजक मंदा कांबळे संचालिका समाज प्रबोधिनी बहुदेशिय संस्था चाळीसगाव हे राहतील.

यशस्वितेसाठी यांनी घेतले परिश्रम
भारतीय बौध्द महासभा चाळीसगावचे पदाधिकारी लक्ष्मण निकम, गोविंद निकम, प्रकाश सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. नंतर प्रबोधनगित सादर केले शेवटी आभार मंदा कांबळे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी संदीप पाटील, बाळु मोरे, शरद बागुल, योगेश जाधव, संतोष गांगुर्डे, संजय भोसले, सत्यभामा जाधव, ज्योती गायकवाड, भाग्यश्री गवळे, भारती निकम, रेखा पाईकराव, संगीत जाधव, सुनिता पवार, अनुसया पाईकराव, सुनिता गवळे, रेणुका पवार, बेबाबाई पाटील, मुक्ता बाई मोरे, मालनबाई चक्रनारायन, शोभाताई वानखेडे, शितल पाटील, साक्षी मोरे, गायत्री गायकवाड, शोभाबाई पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Copy