‘बहिणाबाई महोत्सवा’चा शानदार प्रारंभ

0

जळगाव । खान्देशातील लोकसंस्कृतीचा आरसा असलेल्या पाच दिवस चालणार्‍या बहिणाबाई महोत्सवाला सुप्रसिध्द सिने अभिनेत्री केतकी माटेगावकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यानंतर केतकीने गायलेल्या मला वेड लागले प्रेमाने या गीतांने उपस्थितांचे मन जिंकले. तसेच उद्घाटनपर भाषणात माटेगावकर यांनी आपल्या केतकी फाऊंडेशनची घोषणा केली. जी गरीब मुलींसाठी काम करणार आहे. माटेगावर यांनी खान्देशात येवून आनंद होत असल्याचे सांगितले. कारण माटेगावकर आडनाव मुळ खांदेशातल माटेगाव हे खान्देशात आहे. यामुळे माटेगावकर आम्ही खान्देशातलेच यामुळे आज मी घरी आले असे मला वाटते असे माटेगावर यांनी सागून श्रोत्यांचे मन जिंकले. तसेच माटेगावकर यांनी उपस्थितांशी हितगुज साधत सर्वांना आपलेसे केले. भरारी फाऊंडेशनचे अध्यक्ष दिपक परदेशी यांनी आमंत्रित केल्याने त्यांचे आभार माटेगावकार यांनी मानले.

केतकी फाऊंडेशनची केली घोषणा

माटेगावकर यांनी काकस्पर्शांतील बहिणाबाई यांची अरे संसार संसार जसा तवा चुलीवर आधी हाताले चटके तवा मिळते भाकर ओळीतून बहिणाबाईंनी सर्व साधा सोप्या भाषेत संपूर्ण आयुष्याचे, जीवनाचे सार आपणास सांगितले आहे असल्याचे सांगितले. जीवनाचे सार सांगाणार्‍या कवयीत्री यांचा सोहळात बोलविल्याचा खुप आनंद झाला असे सांगितले. केतकी फाऊंडेशनची घोषणा यावेळी केली. केतकी फाऊंडेशन स्थापन करण्या मागील स्पर्शभूमी माटेगावकर यांनी स्पष्ट केली. यावेळी माटेगावकर यांनी तानी सिनेमा पाहून खुप मुली त्यांना भेटायाला येत होत्या. यात एक मुलगी माटेगावकर यांना भेटायला आली होती. जी रस्ते झाडायची व सार्वजनिक शौंचालय साफ करायची यामुलीचे स्वप्न होते की तीला शिकायचे होते, मोठे व्हायचे होते. पण तिच्या आई-बाबांनी तीचे शिक्षण बंद केले होते. तानी सिनेमा पाहून तिच्या आई-वडीलांनी तिची शाळा पुन्हा सुरू केली. त्यामुलीला स्कॉलरशीपमिळवून ती चीनमध्ये आहे. यामुळे अशा अनेम मुली त्यांची मोठी मोठी स्वप्न आहेत अशा मुलींसाठी केतकी फाऊंडेशनची स्थापना केली आहे. हे फाऊंडेशन अशा मुलींच्या शिक्षणासाठी काम करणार असल्याचे माटेगावकर यांनी स्पष्ट केले.

महिला सक्षमीकरणाचे आवाहन

याप्रसंगी मंचावर आमदार चंदूभाई पटेल, आमदार सुरेश भोळे, दलुभाऊजैन, निशा जैन, सिमा भोळे, महाराष्ट्र बँकेचे उपमहा प्रबंधक निशिकांत वाघचौरे, भरत अमळकर, सुशीलकुमार झुणझुनवाला, अनिशभाई पटेल, बाळासाहेब सूर्यवंशी, डॉ. पी.आर.चौधरी, श्रीराम पाटील, कृषि अधिकारी विवेक सोनवणे, रत्नाकर पाटील, डॉ. रेखा महाजन, डॉ. प्रिती दोषी , आश्‍विनी शेंडगे, पराग माटेगावकर आदी उपस्थित होते. निशा जैन यांनी भरारी फाऊंडेशन चांगले उद्देश घेवून पुढे येत आहे असल्याने त्यांना शुभेच्छा दिल्या, महिला सक्षमीकरणासाठी पुढे येण्याचे आवाहन केले.

यांचा करण्यात आला सन्मान

अनिल भोकरे (प्रशासकीय), सुजाता पाटील (सामाजिक), लक्ष्मण सपकाळे (प्रशासकीय), कु. नीता पाटील (राष्ट्रीय बालशौर्य), मिनाक्षी निकम (सामाजिक), अपर्वा भट (सांस्कृतिक), हेमंत बेलसरो (सामाजिक), विशाल पाटील (दूरचित्रवाणी), ज्योती श्रीवास्तव (शैक्षणिक), अंजली पाटील (क्रीडा), नितीन वाळके (कृषी), मीनल जैन (शैक्षणिक) यांना गौरविण्यात आले.