बहिणाबाईंना काव्य गायनातून आदरांजली

0

जळगाव । खान्देश कन्या बहिणाबाई चौधरी रचित काव्यांना संगीतबद्ध तालात कलावंतांनी सादरीकरण केले. अकोला तसेच जळगाव जिल्ह्यातील कलावंतांनी सहभाग घेतला होता. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून जैन इरिगेशन च्या ज्योती भाभी जैन, जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर लावली फाउंडेशनचे सुनील पाटील,स्वरवेध चे भागवत पाटील,प्रा संजय पत्की,बहिणाबाई चौधरी यांच्या नातं सून स्मिता चौधरी आदी मान्यवर कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित होते. मान्यवरांनी तसेच उपस्थित श्रोत्यांनी खानदेशकन्या कवियत्री बहिणाबाई चौधरी यांच्या निवडक सांगीतिक रचना, कविता संगीतबध्द नजराणा जळगावकरांना देण्यात आला. यावेळी श्रोते मंत्रमुग्ध झाले होते.

बहिणाबाई मेमोरियल ट्रस्ट चे आयोजन
अकोला येथील स्वराश्रय अकादमीचे कलावंतांनी काव्यांजली च्या रुपात खानदेश कन्या बहिणाबाईंना स्वरांजली अर्पण करण्यात आली. सबर्वेध फाउंडेशन आणि बहिणाबाई मेमोरियल ट्रस्टतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या परिवारातल्या विविध जबाबदार्‍या सांभाळून कलावंत कला जोपासत असून विविध कार्यक्रम कलावंतांनी सादरीकरण केले आहे. कार्यक्रमाची योगिनी सोनटक्के हिच्या कवितेपासून सुरुवात करण्यात आली. प्रिया माई ,श्रेयस पाटील ,सुनीता खराटे,नयना इनामदार,प्रदा टेम्भूर्नी,गोपाळ राऊत आदी कलावंतांनी संगीतबद्ध कविता सादर केल्या. ज्योती पाटील,स्वाती पाटील यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. वाद्याची साथसंगत मानेकर ,मनोज राऊत,प्रवीण पंचघरे , अजिक्य इनामदार, तबल्यावर अनुक्रमे, वसंतराव मोघे, खेमराज पाटील, आदी कलावंतांनी कलाकारांच्या गीतांना साथसंगत केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वरवेध फाउंडेशन , भागवत पाटील,राजू फुलवानी,मयूर पाटील ,दिघात वानखेडे,निहार पत्की आणि स्वराश्रय अकादमीच्या कलावंताचे सहकार्य लाभले.