बहारदार गाण्यांवर रायसोनीच्या विद्यार्थ्यांनी धरला ठेका

0

जळगाव । मला वेळ लागले प्रेमाचे, खेळ मांडला, झिंग झिंग झिंगाट, कोई कहे कहेता रहे, रंग दे तू मोहे गेरुआ, मेरा मुर्गा हुआ है दिवाना, सर्दी खासी लवेरीया हुआ, मै तो रस्ते से जा राहा था, प्रेम रतन धन पायो, नगाडा संग ढोल बाजे, शिटी वाजली, मला लागली कुणाची गुचकी, दुधवाल्याने वाजली घंटी व भोजपुरी सारख्या सदाबहार गाण्यांवर गीत गायन स्पर्धेत स्पर्धकांनी रसिकांची मने जिंकली. स्पर्धकांसोबत प्रेक्षकांनीही या सदाबहार गाण्यांवर चांगलाच ठेका धरला होता. जी.एच.रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित अंतराग्नी 2017 या वार्षिक स्नेहसंमेलनाला गीत गायन, अंताक्षरी, नाटक व पारंपारिक वेशभूषा या कार्यक्रमांनी सुरुवात झाली.

नाटकातून दिला प्रेमाचा संदेश
कार्यक्रामच्या सुरूवातीला सरस्वती मातेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ.प्रभाकर भट, उपप्राचार्य प्रा.हरीश भंगाळे व स्नेहसंमेलन समन्वयक प्रा.दीप्ती सोनवणे व सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. स्पेशल डे मध्ये ट्रेझरहंट, फोटोग्राफी, जाहिरात, थीम दे साजरा करण्यात आले. गीत गायन स्पर्धेतील सहभागीतांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. अंताक्षरीत शब्द, धून व कपल अशा तीन फेरीत हि स्पर्धा झाली. नाटकातून सामाजिक भान व आपली जबाबदारीने प्रेमाचा संदेश देत रसिकांना हास्य अनावर झाले. यावेळी कार्यक्रमात विद्यार्थी-विद्यार्थींनीची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

कलाकारांची साकारली वेशभुषा
वेशभूषा स्पर्धेत मराठी पैठणी, मारवाडी, काश्मिरी, पंजाबी, मद्रासी, बाजीराव मस्तानी, काशीबाई, वारकरी संप्रदाय, व सिने कलाकार निळू फुले यांच्या वेशभूषा विद्यार्थ्यांनी साकारल्या होत्या. स्पर्धेत हिंदी मराठी काव्य सादर करीत स्पर्धकांनी मैफिल जमवली तर काही विद्यार्थ्यांनी शेरोशायरी ने या स्पर्धेला जोड दिली. गीत गायन स्पर्धेला परीक्षक म्हणून उमविचे राजेंद्र गोहिल तर अंताक्षरी स्पर्धेला परीक्षक म्हणून प्रा.सुशांत सामलेटी, प्रा.हिरालाल साळुंखे, प्रा.शितल जाधव लाभल्या होत्या. यावेळी परीक्षकांनी स्पर्धकांना दाद देत आपले मनोगत व्यक्त केले. स्पर्धेचे नियोजन व वेळबद्धता टिकून राहावी याकरिता प्रत्येक स्पर्धेला प्राध्यापकांची समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.