बस सेवा सुरूळीत करण्याची मागणी

0

चाळीसगाव । तालुक्यातील उंबरखेड येथील आडगाव-उंबरखेड बस सेवा मागील दोन ते तीन दिवसांपासून बंद करण्यात आलेली आहे. उंबरखेड रस्त्याचे काम सुरू असल्याने ही बस सेवा बंद करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. रस्त्याचे काम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पर्यायी देवळी मार्गे बस सेवा सुरळीत करण्याची मागणी होत आहे. बस सेवा बंद झाल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल सहन करावे लागत आहेत. या बसद्वारे उंबरखेड विद्यार्थी शिक्षणासाठी जात असतात. यातच या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू असून त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. यासोबतच ग्रामस्थांची देखील तारांबळ उडत आहे. आडगाव-उंबरखेड बस सेवा सुरळीत करण्याची मागणी पीपल्स सोशल फाऊंडेशनच्यावतीने आगार प्रमुखांना निवेदन देवून करण्यात आली आहे. आगार प्रमुखांना निवेदन देतांना पीपल्स सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष आकाश पोळ, सागर मोरे, दिपक मोरे, शुभम महाजन, भूषण पाटील, नरेंद्र पाटील, सचिन पाटील, पियुष चव्हाण, निखिल मोरणकर, गोपाल राजपुत, अमोल बागुल, हर्षल पाटील, किरण गायकवाड, धनंजय वाघ, धनंजय राजपुत, तेजस राजपुत, अमोल पाटील, प्रशिक धीवरे, विशाल मुलमुले, ऋषिकेश जाधव, कुलदीप महाजन, सौरभ काळे आदी उपस्थित होते.