बस-ट्रकची समोरासमोर धडक; तीन जण गंभीर

0

जळगाव । शहरात येणार्‍या एस.टी. बस आणि आकाशवाणी चौकाकडून अजिंठा चौफुलीकडे जात असलेल्या ट्रकची भिषण धडक होऊन अपघातात झाल्याने बसवरील चालक, वाहक तसेच ट्रक चालक गंभीर जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावर विनोद हॉस्पीटलसमोर शुक्रवारी 5 मे रोजी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास घडल्याने नागरिकांची मोठी धावपळ उडाली होती. घटनेनंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक विस्कळीत झाल्याने तात्काळ पोलिसांना माहिती कळविण्यात आली. स्थानिक जखमींना हलविण्यास उपस्थिता कडून दिरंगाई करण्यात आल्याची माहिती मिळाली होती. मात्र वाहतूक शाखेचे कर्मचारी पोहचताच मदत कार्यास सुरुवात झाली. या अपघात बस मधील तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ तात्काळ दाखल करण्यात आले. या घटनेबाबत ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाहतूक पोलीस मदतीला
जखमींना हलविण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नसल्ययराचे दिसले.अपघाताची माहिती कळताच दिनेश चव्हाण, शैलेंद्र बाविस्कर, नितीन ठाकूर यांनी घटनास्थळी धाव घेऊन तिघा गंभीर जखमींना अपघातग्रस्त वाहनातून बाहेर काढून विनोद हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले गेले. नंतर बसमध्ये किरकोळ दुखापत झालेल्या पाच ते सहा प्रवाश्यांना बाहेर काढून रिक्षात टाकून रूग्णालयात दाखल केले.

भीषण अपघाताने बस कापली
यावल डेपोची बस क्रमांक (एम.एच. 20 बी.एल. 0932) ही खिरोदा येथुन पहाटे जळगावला निघाली असता ईच्छादेवी चौफुली बसने पार केल्यावर आकाशवाणी चौकातुन बस वळण घेऊन नवीन बसस्थानकात जाणाच्या तयारीत असतांना महामार्गावर समतानगराकडून ट्रक क्रमांक (एम.एच. 19 झेड. 5356) आकाशवाणी चौकात वळण घेणार्‍या अजिंठा चौफुलीकडे जाण्यासाठी महामार्गावरून जात होता. वाहने वेगात असल्याने दोन्ही वाहनात भीषण धडक झाली. सदरील अपघात झाल्याने तब्बल आर्धी बस चक्काचूर झाली आहे. एस.टी.चालकाच्या साईडकडून आर्धा बसचा पत्रा व सीट कापले गेले होते. बसचालक भागवत पदमाकर लोहार (45, रा. यावल), वाहक तेजसिंग ठाणसिंग राजपूत (52) आणि ट्रक चालक आदिलखान नवाजखान (21, रा. समतानगर) तिघे गंभीररित्या जखमी झाले होते.

महामार्गाची वाहतूक सुरळीत
अपघातामुळे महामार्गावरील वाहतुक विस्कळीत झाली. महामार्गाचे अधिकारी जाधव, अतुल पाटील, रनित, कैलास चव्हाण, समिर तडवी तर शहर वाहतूक शाखेचे सुभाष चव्हाण, दिनेश चव्हाण, सुभाष घोडेस्वार, राजकुमार चव्हाण, सुनिल सोनवणे यांनी घटनास्थळी जाऊन वाहतुक सुरळीत करण्यात आली. सकाळी पावणेनऊ वाजता क्रेन मागवून पोलीसांनी अपघातग्रस्त बसला महामार्गावरून हटविले व वाहतूक सुरळीत झाली.