बसमध्ये चढतांचा प्रवाश्याचा मोबाईल लांबविला

0

जळगाव : नविन बसस्थानकावर सोयगांव बसमध्ये चढतांना एका प्रवाश्याचा खिशातून मोबाईल लांबविण्याची घटना आज उघडकीस आली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरूध्द जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उमराम रुपचंद राजपुत (वय-58 रा. गणेश कॉलनी, ह.मु. कोल्हे नगर) हे बुधवारी 28 डिसेंबर रोजी शालक रामदास राजपुत यांच्याकडे जायचे असल्याने सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास शहरातील नविन बसस्थानक येथे आले. यावेळी सोयंगाव बसमध्ये चढत असतांना त्यांच्या पॅन्टच्या खिशातून अज्ञात चोरट्याने मोबाईल लांबविला. बसमध्ये बसल्यानंतर उमराव राजपूत यांना मोबाईल खिशात नसल्याचे समजले. त्यांनी परिसरात मोबाईलचा शोध घेतला. मोबाईल कोठेडी आढळून न आल्याने चोरीचा झाल्याची त्यांना खात्री झाली. आज रविवारी उमराव राजपूत यांनी याबाबत तक्रार दिली. त्यानुसार 28 हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरी केल्या प्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. पूढील तपास दिलीप पाटील करीत आहेत.