बसच्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार

0

अमळनेर । तालुक्यातील मंगरूळ पिपंळे बुद्रुक गावादरम्यान मोटर सायकल व बसच्या अपघातात 1 जण मयत तर 2 जण गंभीर जखमी झाल्याची घटना दि 11 रोजी सकाळी 11.45 दरम्यान झाला असून अमळनेर पोलीसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. अमळनेर आगाराची जवखेडा अमळनेर बस क्र एम एच 20 बी एल 1481 हि जवखेडा हुन अमळनेरकडे येत असतांना मोटर सायकल क्र (एमएच 18 एक्स 5304) हिस जोरदार धडक दिली. त्यात मोटरसायकलवरील सुनिल निंबा चौधरी (वय-35, रा.पिंपळे बुद्रुक) हा जागेवरच मयत झाला तर पिंटू सुकलाल भिल, संजय भगवान भिल (रा. चिमणपुरी) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना धुळे ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. योगेश अशोक पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बस चालक (नाव माहीत नाही) यांच्या विरोधात अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ सुभाष महाजन हे करीत आहेत.