बसचा धक्का लागल्याने वृद्धा जखमी; गुन्हा दाखल

0

पाचोरा । रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या स्पीड ब्रेकर जवळ एसटी ने 80 वर्षीय वृद्धेला धडक दिल्याने महिला जखमी झाली असून हि घटना तालुक्यातील रोहिणी हातगांव रस्त्यावरील पाण्याच्या टाकीजवळ 11 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजता घडली आहे. एसटी चालकाविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जामनेर पोलिस करीत आहे.

बसचालकाविरोधात झाला गुन्हा दाखल
याबाबत माहिती अशी कि, तालुक्यातील रोहिणी हातगांव रस्त्यावर पाण्याच्या टाकीजवळ उभ्या असलेल्या 80 वर्षीय वृद्ध द्वारकाबाई दशरथ बागर यांना न्यायडोंगरी कडून चाळीसगावकडे येणार्‍या बस क्रमांक (एमएच 12 सीएच 7695) ने स्पीड ब्रेकरजवळ गाडी हळू केल्याने वृद्धेला धडक दिली त्यात वृद्धेच्या पायाला मार लागल्याने त्या जखमी झाले असून त्यांचे वर चाळीसगाव येथील कर्तारसिंग परदेशी यांच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी आणा विनायक बागर (34, रा.रोहिणी ता. चाळीसगाव) यांच्या फिर्यादीवरून वरील एस टी चालकाविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक दीपक ठाकूर करीत आहेत.