बळीरामपेठेतील 11 दुकाने सील; लपून-छपून सुरू होते व्यवहार

जळगाव- कोरोना कालावधीतील नियमांचे उल्लंघन करीत लपून-छपून व्यवहार करणार्‍या 11 दुकानांना महापालिकेच्या पथकाने मंगळवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास सील करुन दुकानदारांवर दंडात्मक कारवाई केली, अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त संतोष वाहुळे यांनी दिली.
कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी 15 मेपर्यंत कडक निर्बंध जाहीर केले आहे. यात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा बंद ठेवण्याचे आदेश आहेत. पण, शहरातील काही ठिकाणी अनेक दुकानदार शटर बंद ठेवून आत व्यवहार करीत असल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत काही जणांनी महापालिकेच्या अधिकार्‍यांना निनावी फोनद्वारे कळविले होते. महापालिकेचे अधिकारी, कर्मचार्‍यांनी बळीरामपेठेतील संबंधित दुकानांवर छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत बळीराम पेठेतील बजाज ट्रेडर्स, श्री बालाजी सन्स, अरिहंत कटलरी सेंटर, मेमसाब जनरल, जय वैष्णवी जनरल स्टोअर्स, बाहेरा गल्ली, वाहेगुरू इलेक्ट्रिकल, जेएमपी मार्केट, नंदुरबारकर सराफ, नागदवे इंटरप्रायजेस, गजानन प्लाझा या दुकानांना सील करुन त्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही कारवाई उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या उपस्थितीत अतिक्रमण विभागातील संजय ठाकूर, सुनील पवार, किशोर सोनवणे, नाना कोळी, नितीन भालेराव, राहुल कापरे, सलमान भिस्ती आदींनी केली.

Copy