बनावट धनादेश प्रकरणी आरोपीला अटक

0

भुसावळ : मयत पतीच्या नावावर असलेला इन्शुरन्स क्लेम मंजूर करण्यासाठी पैसे घेऊन बनावट धनादेश तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी एका आरेापीला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली. फिरोज सिकंदर तडवी (आर.एम.एस.कॉलनी, शिवपूर कन्हाळा रोड, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. तक्रारदारर कनिस बी.रज्जाक मणियार (40, मुस्लिम कॉलनी) यांच्या पतीचे निधन झाल्यानंतर पतीच्या नावावर असलेले एच.डी.एफ.सी.लाईफ इन्शुरन्स पॉलिसीचा 29 लाखांचा क्लेम मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून आरोपी नऊ लाखांची रक्कम उकळली होती शिवाय तक्रारदाराला 29 लाखांचा बनावट धनादेश देवून फसवणूक केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल होता. आरोपीला 31 जुलै राजी अटक करण्यात आल्यानंतर असून त्यास चार दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. तपास सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे व नाईक किशोर महाजन करीत आहे.

Copy