बनावट दारूचा धुमाकूळ

0

शिरपूर । शि रपूर तालुक्यातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी येथील पोलिसांनी दि.3 रोजी दुपारी धाड टाकून 210 लिटर स्पिरीटसह 1 हजार 800 बनावट दारूच्या बाटल्या असा 1 लाख 68 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. दुसर्‍या घटनेत तालुक्यातील खामखेडे येथील हिम्मत उत्तम कोळी याचा घरातून 1 लाख 26 हजार किंमतीची गोवा व्हिस्की ही बनावट दारूच्या 1 हजार 800 बाटल्या जप्त करण्यात आल्या. ही दारू विक्रीची महाराष्ट्रात परवानगी नसल्याचे पोलिसांनी सांगितले. सदर कारवाई पोलिस निरीक्षक दत्तात्रय पवार, ए.पी.आय. ए.ए.पटेल, हवलदार एल.बी.चौधरी, विश्‍वास पाटील, नेरकर, संदीप रोकडे यांच्या पथकाने केली.

साचने शिवारातील दारु अड्डा उध्वस्त
धुळे तालुक्यातील साचनेमध्ये शिवारात 2 रोजी गावठी दारु अड्ड्यावर धाड टाकून दारुला लागणारे रसायन व साहित्य जप्त करण्यात येवून नष्ट करण्यात आले. जिल्ह्यात गावडी दारुच्या उच्चाटन करण्यासाठी पोलिस प्रशासनाने पाऊल उचल्ला आहे. ठिकठिकाणी धाडी टाकून गावठी दारुच्या अड्डे उध्वस्त केले जात आहे. साचने शिवारात गावडी दारुची विक्री होत असल्याची माहिती मिळाले नंतर एपीआय वार्‍या यांच्या पथकाने साचने शिवारात धाड टाकून लागणारे रसायने व इतर साहित्य नष्ट केले.

कारवाईने दणाणले धाबे
तालुक्यातील शिरपूर फाट्यावरील संगिता लॉन्स शेजारी असलेल्या रिकाम्या जागेवरील शेडमध्ये बनावट दारू बनविण्यासाठी लागणारे 35 लिटरप्रमाणे 4 कॅनमधील 140 लिटर स्पिरीट ,20 लिटर प्रमाणे 3 कॅनमधील 60 लिटर स्पिरीट तर 10 लिटरप्रमाणे एका कॅनमधील 10 लिटर स्पिरीट असे एकूण 42 हजार रूपये किंमतीचे स्पिरीट जप्त करण्यात आले. याप्रकरणी हवलदार संदिप संभाजी रोकडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महेंद्र गिरासे (36) रा.आमोदे ता.शिरपूर व अंकल (पूर्ण नाव माहित नाही) रा.सांगवी ता.शिरपूर या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील गिरासे यास ताब्यात घेण्यात आले आहे.