बनावट चॅटींग तयार करीत महिला डॉक्टरची बदनामी

Female doctor defames young woman by sending fake chats to future husband जळगाव : बनावट चॅटींग तयार करीत त्यात पीडीता फोटो वापरुन त्याचे स्क्रिन शॉट महिला डॉक्टर तरुणीच्या भावी पतीला पाठवण्यात आले. बदनामी झाल्या प्रकरणी महिला डॉक्टरांनी तक्रार दिल्यानंतर सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

सायबर पोलिसात गुन्हा
पाचोरा तालुक्यातील रहिवासी असलेल्या डॉक्टर तरुणीचा फोटो वापरुन त्या वापरत असलेला मोबाईल क्रमांकावरुन बनावट चॅटींग तयार केले. तसेच त्याचे स्क्रिन शॉट तयार करीत त्या महिला डॉक्टरच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन त्यांच्या होणार्‍या भावी पतीला पाठवित त्यांची बदनामी केल्याचा प्रकार शनिवार, 6 ऑगस्ट रोजी रोजी उघडकीस आला. दरम्यान, त्या महिला डॉक्टरने तात्काळ सायबर पोलिसात धाव घेत तक्रार दिल्याने सोमवार, 8 ऑगस्ट रोजी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे हे करीत आहे.