बदनामी करणार्‍या समाज माध्यमांवर कारवाई करावी

0

सामूहिक प्रतिष्ठीत मुस्लिम समाजाच्या वतीने फैजपूर पोलिसांना निवेदन

फैजपूर : देशावर कोरोना या विषाणूंच्या प्रादुर्भावाने मोठे संकट निर्माण झाले असून संपूर्ण देशात 21 दिवसांचा लॉक डाऊन सुरू असून अशा कठीण प्रसंगी हजरत निजामुद्दीन मरकज मुस्लिम समाजाचा तबलीक जमातचा धार्मिक कार्यक्रमासाठी काही नागरीक दिल्ली येथे अडकले होते परंतु काही प्रसार माध्यमे दररोज तबलीक जमात बद्दल व मौलाना साद साहब यांच्या बद्दल अत्यंत अपमानास्पद बदनामी करीत असल्याने अश्या प्रसार माध्यमावर कडक कारवाई करण्यात यावी, अश्या मागणीचे निवेदन येथील सामूहिक प्रतिष्ठीत मुस्लिम समाजाच्या वतीने फैजपूर पोलिस स्टेशनला देण्यात आले.

अँकर व एडिटर त्वरीत गुन्हे दाखल करावेत
सर्व जग कोरोनाने होरपळून निघत आहे. प्रत्येकाच्या मनात धास्ती आहे ती कोरोना या संसर्गजन्य विषाणूंची. आपल्या देशावर सुद्धा कोरोना या विषाणूंच्या प्रादुर्भावाने मोठे संकट आज रोजी निर्माण झाले आहे. संपूर्ण देशात 21 दिवसांचा लॉक डाऊन सुरू आहे. अशा कठीण प्रसंगी हजरत निजामुद्दीन मरकज मुस्लिम समाजाचा तबलीक जमातचा धार्मिक कार्यक्रमासाठी काही नागरीक दिल्ली येथे अडकले होते परंतु काही प्रसार माध्यमातून दररोज तबलीक जमात बद्दल व मौलाना साद साहब यांच्याबद्दल अत्यंत अपमानास्पद बदनामी करीत चुकीचे शब्दाचा वापर करीत आहे. कोरोना जिहाद, तालिबानी, आतंकवादीविरोधी कृती करणारे असे दर्शवण्याचे काम तबलीक जमात करीत आहे तसेच संपूर्ण मुस्लिम समाजाला बदनाम करण्याचे व धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न काही प्रसार माध्यम करीत आहे. अश्या प्रसार माध्यमांच्या अँकर व एडिटर त्वरीत गुन्हे दाखल करण्यात यावे, अश्या मागणीचे निवेदन फैजपूर येथील सामूहिक प्रतिष्ठीत मुस्लिम समाज्याच्या वतीने फैजपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे यांना देण्यात आले. या निवेदनावर नगरसेवक शेख कुर्बान, कलीम खा मण्यार, कौसर अली, शकील शेख, आवेश भांजा, अलीम सौदी आदींच्या स्वाक्षर्‍या आहे.

Copy