बंद घरातून 68 हजारांचा ऐवज चोरीला : वरणगावातील घटना

Bold burglary in Warangaon City: 68 Thousand Stolen भुसावळ : तालुक्यातील वरणगाव येथे घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी 68 हजारांचा ऐवज लांबवला. ही घटना 3 ते 13 ऑगस्ट दरम्यान घडली. या प्रकरणी वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. चंद्रशेखर शांताराम अवतारे (71, अयोध्या नगर, वरणगाव) हे बाहेरगावी गेल्याने घराला कुलूप असल्याची संधी चोरट्यांनी साधली. 3 ते 13 ऑगस्टदरम्यान केव्हातरी चोरट्यांनी ही चोरी केली. चोरट्यांनी कपाटातील 60 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मणी, आठ हजार रुपये किंमतीच्या तोरड्या व अन्य दागिणे, बाळाचे कडे असा एकूण 68 हजारांचा ऐवज लांबवला. अवतारे गावाहून परतल्यानंतर चोरीची बाब उघडकीस आली. तपास सहाय्यक निरीक्षक आशीषकुमार अडसुळ करीत आहेत.