बंद घराचे कुलूप तोडून चोरी

0

चिंचवड : यात्रेसाठी गावी गेल्यामुळे बंद असलेल्या घराचे कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना सोमवारी लांडेवाडीमधील टेल्को रस्त्यावर उघडकीस आली. मनीषा लक्ष्मण सर्वगोड (वय 39, रा. लांडेवाडी) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंढरपूर तालुक्यातील पुळूज गावात लिंगेश्‍वराची यात्रा असते. या यात्रेसाठी फिर्यादी मनीषा आणि त्यांचा परिवार शुक्रवारी (दि. 23) गावी गेले. त्यानंतर त्यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील कपाटामध्ये ठेवलेले 64 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. सोमवारी (दि. 26) मनीषा यांच्या घराशेजारी राहणार्‍या महिला सीमा जानराव (वय 26) यांनी फोन करून त्यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याचे सांगितले. त्यानुसार मनीषा तात्काळ लांडेवाडी येथे आल्या असता हा प्रकार उघडकीस आला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Copy