बंद घराचे कुलूप तोडून केली चोरी

0

चिखली : बंद घराचे कुलूप तोडून घरातून आणि बँक अकाऊंटमधून असा एकूण एक लाख सहा हजार 900 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना सोमवारी मोरेवस्ती चिखली येथे उघडकीस आली. भरत प्रल्हाद वाडिले (वय 35, रा. मोरेवस्ती, चिखली) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भरत मोरेवस्ती मधील अंगणवाडी सोसायटीमध्ये संतोष धस यांच्या खोलीत भाड्याने राहतात. ते रविवारी रात्री अकराच्या सुमारास कामानिमित्त घराबाहेर पडले. बाहेर पडताना त्यांनी घराला कुलूप लावले होते. रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरात ठेवलेले 59 हजार 900 रुपये रोख रक्कम चोरून नेले. तसेच त्यांच्या एचडीएफसी बँकेच्या खात्यामधून 47 हजार रुपये काढून घेतले. यावरून भरत यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

Copy