बँकेतून 30 हजार लांबवले : एकाविरुद्ध गुन्हा दाखल

0

भुसावळ : न्यू सातारा भागातील रहिवासी अनिश वाहाब देशमुख यांच्या एचडीएफसी बँकेच्या खात्यातून संशयीत अरोपी राजकुमार (मोबाईल नं. 85095211858) नावाच्या व्यक्तीने तीस हजार रुपये बँकेतून परस्पर काढल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद कुमार गोसावी पुढील तपास करीत आहे.