बँकाचे व्यवहार ग्राहकांसाठी आता बंद

0

जळगाव – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ज्या ठिकाणी प्रतिबंध करण्यात आला आहे, त्याठिकाणच्या सर्व बँकांमधील व्यवहार आता ग्राहक व नागरिकांसाठी बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज जारी केले. दरम्यान ग्राहकांना घरपोच किंवा ऑनलाईन सेवा देण्याच्या सुचना करण्यात आल्या आहे. यात बँकांचे अंतर्गत कामकाज मात्र सुरू राहणार असुन बँक प्रशासनाने अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी सॅनेटायझर, हात धुण्याची व्यवस्था, मास्कचा वापर, सोशल डिस्टंन्सींग पाळण्याचे आदेशही जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहे.

Copy