फैजपूर शहरात हनुमान जयंती निमित्त मिरवणूक उत्साहात साजरी

0

फैजपूर । हनुमान जयंती निमित्त शहरातून सालाबादाप्रमाणे जयंती यावर्षीही मोठ्या जल्लोषात श्री हनुमान जयंती उत्सव समितीच्यावतीने साजरी करण्यात आली. सुरुवातीला महामंडलेश्‍वर स्वामी जनार्दन महाराज, आमदार राजूमामा भोळे, माजी नगराध्यक्ष निलेश राणे, एपीआय अधिकारी नेहेते यांच्या शुभहस्ते श्री हनुमान बाप्पांच्या मुर्तीचे पूजन हा सामुहिक आरती करुन मिरवणूकीला सुरुवात करण्यात आली.

मिरवणूकीत यांची होती उपस्थिती
माजी नगरसेवक अजय महाजन, सुनिलशेठ वाढे, देवेंद्र बेंडाळे, राकेश जैन, यावल नगरसेवक डॉ.कुंदन फेगडे, माजी शहराध्यक्ष पप्पू चौधरी, संदीप भारंबे, रविंद्र सरोदे, पिन्टू तेली, चंद्रकांत भिरुड आदींची उपस्थिती होती. यावेळी महामंडलेश्‍वर स्वामी जनार्दन श्रीजी महाराज यांनी उपस्थितांना मार्गदर्शनही केले.

महामंडलेश्‍वर महाराजांचे मार्गदर्शन
यावेळी महामंडलेश्‍वर स्वामी जनार्दन श्रीजी महाराज यांनी आपल्या मनोगतातून सर्व युवकांनी निरव्यसनी बननू सर्वांनी जात-पात या आपआपसातील मतभेद विसरुन सामाजिक व धार्मिक कार्यात एकोप्याने सहभागी झाले पाहिजे. शिवजयंती, रामनवमी, हनुमान जयंती, डॉ. आंबेडकर जयंतीतही सहभागी होण्याचे केले आवाहन.

यांनी घेतले परीश्रम
यावेळी समितीच्यावतीने अध्यक्ष वैभव वकारे, उपाध्यक्ष देवा चौधरी, सचिव देविदास कोष्टी, खजिनदार बंटी कोळी, तुषार किरंगे, अमोल वकारे, पवन परदेशी, अजय परदेशी, पराग पाटील आदींनी परिश्रम घेतले. यावेळी पीएसआय मनोहर मोरे, एपीआय सांगळे, हेड कॉन्स्टेबल गोकुळ बयास, मोहन लोखंडे आदी पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आल्याने मिरवणूक शांतते झाली.