फैजपूर येथे आरोग्य शिबिरात रुग्णांची तपासणी

0

फैजपूर। येथे डॉ. इमरान व नगरसेवक यांच्यातर्फे रविवार 12 रोजी आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबिरात विविध रुग्णांची तपासणी करण्यात आली. पोटाचे आजार, मेंदूची तपासणी, युरोलॉजी हाडाचे रोग व विविध रोगांची तपासणी यावेळी करण्यात आली. यावेळी 70 ते 80 रुग्णांची तपासणी करण्यात आली. शिबिरात जळगाव येथील ऑर्किड मल्टिसुपर हॉस्पिटलचे डॉ. सुधिर जयकर यांनी तपासणी केली.

यांची होती उपस्थिती
यावेळी डॉ. जयकर यांनी सांगितले की, राजीव गांधी जिवनदायी योजनेंतर्गत विविध रोगांर उपचारासाठी शासनाकडून मदत मिळत आहे. या शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष व नगरसेवक मिलींद वाघुळदे यांनी सांगितले की, रुग्णसेवा ही ईश्‍वरसेवा आहे. यावेळी अ. रऊफ जनाब कलीम खॉ मन्यार, आरोग्य सभापती प्रभाकर सपकाळे, डॉ. उमेश चौधरी, डॉ. वर्मा, डॉ. सुनिल पाटील, डॉ. नितीन पाटील, भालेराव, मुख्तार शेठ, इरफान मेंबर, दस्तगीर मोमिन, अ. कादीर अत्तरवाले, शेख इरफान यांच्यासह नागरीक उपस्थित हाते.