फैजपूर येथील गटनेते कलिमखाँ मन्यार अपात्र

0

फैैजपूर । गतकाळात पालिकेत दोन पंचवार्षिक निवडणूक विजयी होवून तिसर्यांदा निवडून आलेेले काँग्रेस व अपक्षांचे गटनेते कलिमखाँ हैदरखाँ मन्यार यांना 2001 नंतरचे तिसरे अपत्य प्रकरणी जिल्हाधिकार्‍यांनी अपात्र ठरविले आहे. येथील सामाजिक कार्यकर्ता शेख सादिक शेख हसन यांनी 24 जून 2015 रोेजी नगरसेवक कलिमखाँ यांच्या विरुध्द जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार अर्ज दिला होता.

काँग्रेसचे नगरसेवकही रडारवर
तब्बल दोन वर्षांनंतर या तक्रारीची दखल घेत गटनेता कलिमखाँ यांना 13 सप्टेंबर 2001 नंतर दोन पेक्षा जास्त अपत्य असल्याने महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम 1965 कलम 44 नुसार अपात्र ठरविण्यात आले आहे. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे. नगरसेवक शेख कुर्बान यांनीदेखील कलिमखाँ यांच्या तिसरे अपत्य प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केली असून अपक्षांसह काँग्रेसचे नगरसेवकही रडारवर असल्याची शहरात चर्चा रंगली आहे. नव्याने निवडून आलेल्या नगरपालिका पदाधिकार्‍यांच्या पहिल्या सभेच्या आधीच गटनेत्यांना अपात्र होण्याची पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच वेळ आली आहे.