Private Advt

फैजपूर पोलिस उपअधीक्षकांसह 12 कर्मचार्‍यांना पोलिस महासंचालक पदक जाहीर

सात हवालदार, चार नाईकांच्या उत्कृष्ट सेवेची दखल : पोलिस अधीक्षकांच्या हस्ते आज गौरव

भुसावळ : पोलिस दलात गुणवत्तापूर्वक सेवा करणार्‍या आणि विशेष कार्य केलेल्या पोलिस अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांना पोलिस महासंचालक पदक जाहीर झाले आहे. रविवार, 1 रोजी महाराष्ट्र दिनानिमित्ताने ध्वजारोहण झाल्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. फैजपूर पोलिस उपअधीक्षक डॉ.कुणाल सोनवणे यांच्यासह जिल्ह्यातील सात हवालदार व चार नाईक यांना पदक जाहीर करण्यात आले आहे.

यांना पोलिस महासंचालकांचे चिन्ह जाहीर
फैजपूर पोलिस अधीक्षक डॉ.कुणाल शंकर सोनवणे, जळगाव मुख्यालयातील संतोष सुरवाडे, जळगाव वाहतूक शाखेच्या महिला हवालदार मेघना जोशी, महामार्ग सुरक्षा पथकाचे शांताराम काळे, जळगाव एटीसीचे रवींद्र भगवान पाटील, भुसावळ बाजारपेठचे नंदकिशोर सोनवणे, भुसावळ पोलिस उपअधीक्षक कार्यालयातील संदीप चव्हाण, चाळीसगाव शहर वाहतूक शाखेचे हेमंत शिरसाठ, जळगाव मुख्यालयाचे रवींद्र वंजारी, जळगाव एटीसीचे प्रवीण पाटील यांना पोलिस महासंचालकांचे चिन्ह जाहीर झाले आहे.