फैजपूर पालिकेत सभापतींची बिनविरोध निवड

0

फैजपूर । पालिकेच्या नुकत्याच झालेल्या सभेत विविध समिती सभापतींची निवड करण्यात आली. याप्रसंगी सभेचे पिठासन अधिकारी जामनेरचे तहसिलदार, नगराध्यक्ष महानंदा रविंद्र होले (टेकाम), उपनगराध्यक्ष हेमराज चौधरी, मुख्याधिकारी सुवर्णा ओगले-शिंदे यांच्या उपस्थितीत वेगवेगळ्या विषय समित्यांच्या सभापतींची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सर्व सदस्य उपस्थित होते.

निवड झालेले विषय समिती सभापती व सदस्य
स्वच्छता व वैद्यकीय आरोग्य समिती – सभापती प्रभाकर पुंडलिक सपकाळे, सदस्य – अमोल किशोर निंबाळे, खान शाहिन परवीन शकील खान, नयना चंद्रशेखर, सार्वजनिक बांधकाम समिती – सभापती नफिसाबी इरफान, सदस्य – शकुंतला मोतीराम भारंबे, वत्सला रघुनाथ कुंभार, फातेमाबी रईस मोेमीन, महिला व बालकल्याण समिती – सभापती मलक साईमाबी आबीद, सदस्य – अमिता हेमराज चौधरी, नयना चंद्रशेखर चौधरी, पुष्पा मनोज कापडे, फातेमाबानो रईस मोमीन, नियोजन व विकास समिती – सभापती देवेेंद्र मोतीराम बेंडाळे, सदस्य – मिलींद शंकरराव वाघुळदे, पुष्पा मनोज कापडे, शेख कुर्बान शेख करीम, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती – सभापती उपनगराध्यक्ष हेमराज खुशाल चौधरी, सदस्य – मणियार कलिमखान हैदरखान, इमरान अख्तर अब्दुल रऊफ, रशिद नसीर तडवी.