Private Advt

फैजपूर पालिकेच्या प्रभारी मुख्याधिकारीपदी संदीप चिद्रवार

फैजपूर : फैजपूर पालिकेच्या प्रभारी मुख्याधिकारीपदी भुसावळ मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांची नियुक्ती जिल्ह्याधिकारी अभिजीत राऊत यांनी केली आहे. पालिकेत नव्याने रुजू झालेले मुख्यधिकारी वैभव लोंढे हे 30 दिवसांच्या वैद्यकीय रजेवर गेले असल्याने त्यांच्याकडे असलेला मुख्यधिकारी पदाचा अतिरीक्त कार्यभार भुसावळ मुखाधिकारी चिद्रवार यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.