फैजपूर नगरपालिकेकडून नागरीकांचे थर्मल स्कॅनिंग

0

फैजपूर : फैजपूर नगरपालिकेकडून नागरीकांची थर्मल स्कॅनिंग व अ‍ॅक्सीमीटरद्वारे ऑक्सिजन व पल्स तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढत आहे. नागरीकांनी तोंडाला मास्क लावावा, वारंवार हात धुवावेत, कामाशिवाय घराबाहेर पडू नये तसेच घरातच रहावेत या सूचना वेळोवेळी प्रशासनाने नागरीकांना दिल्या आहेत तसेच बाहेरगावाहुन आपल्याकडे कुणी आल्यास प्रशासनास कळवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

शहरात आरोग्य तपासणी मोहिम
शहरात नागरीकांची थर्मल स्कॅनिंग तसेच अ‍ॅक्सिमीटरद्वारे ऑक्सिजन व प्लस तपासणी करण्यात येत आहे. गावातील सुभाष चौक, मोठा मारुती, लक्कड पेठ, तूप बाजार या भागासह संपूर्ण गावात नागरीकांची तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेत गुरुवारी सकाळी सुभाष चौकात मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांच्यासोबत पालिका कर्मचारी शिवा नेहेते, लक्ष्मण चावरे, लाला फेगडे, सुधीर चौधरी आदी सहभागी होते. नागरीकांनी घरीच रहावे, सुरक्षित रहावे, असे आवाहन नगरपालिकेकडून करण्यात येत आहे.