फैजपूरात 15 लाखांचा गुटखा जप्त : चौघांविरोधात गुन्हा

फैजपूर : शहादा येथून राज्यात प्रतीबंधीत असलेला गुटखा सावदा शहराकडे येत असल्याची माहिती फैजपूर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाई करीत एका वाहनातून सुमारे 15 लाखांचा गुटखा जप्त केला. या प्रकरणी चौघांविरोधात सोमवारी रात्री फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघा आरोपींना अटक करण्यात आली.

चौघा आरोपींविरोधात गुन्हा : दोघांना गुन्हा
फैजपूर अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ रविवारी दुपारी महेंद्रा पिकअप वाहन (एम.एच.46 ई.6125) ची तपासणी केल्यानंतर त्यात 15 लाख 70 हजार 800 रुपये किंमतीचा गुटखा आढळला. या प्रकरणी राजेश बर्‍हाटे यांच्या फिर्यादीनुसार संशयीत आरोपी अरबाजखान नवाज खान पठाण व शे.जमिलोद्दीन रफियोद्दीन (शहादा, जि.नंदुरबार), साहिल रफिक मेमन (शहादा, जि.नंदुरबार) व मोहसीन शेख (अडावद) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुटखा व वाहनासह 19 लाख 20 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अरबाजखान नवाज खान पठाण व शे.जमिलोद्दीन रफियोद्दीन (शहादा, जि.नंदुरबार) यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सहा.निरीक्षक सिद्धेश्‍वर आखेगावकर, उपनिरीक्षक मोहन लोखंडे, हवालदार देविदास सुरदास, हवालदार राजेश बर्‍हाटे आदींच्या पथकाने ही कारवाई केली. तपास उपनिरीक्षक मोहन लोखंडे, कॉन्स्टेबल महेंद्र महाजन, चेतन महाजन, होमगार्ड श्रीकांत इंगळे करीत आहेत.

Copy