फैजपूरात रीक्षा चालकाची आत्महत्या

फैजपूर : शहरातील जगनाडे नगरात गेल्या चार दिवसांपूर्वीच भावाकडे आलेल्या नितीन शशिकांत तायडे (37) या रीक्षा तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी सकाळी उघडकीस आली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. नितीन तायडे हा न्हावी येथे एकटाच वास्तव्यास होता व रीक्षा चालवून तो आपला उदरनिर्वाह करत होता. दरम्यान, चार दिवसांपूर्वी फैजपूरातील जगनाडे नगरातील भावाकडे तो आला असता शुक्रवारी मध्यरात्रीनंतर नितीनने गळफास घेत आत्महत्या केली. पोलिसांनी मृतदेह यावलला शवविच्छेदनासाठी रवाना केला. या घटनेप्रकरणी उल्हास तायडे यांच्या खबरीनुसार पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सहा.निरीक्षक प्रकाश वानखेडे, पोलीस नाईक उमेश चौधरी करीत आहेत.