फैजपूरात मध्यरात्री एकावर चाकूहल्ला

फैजपूर : शहरातील डॉ.आंबेडकर नगरात एकावर घरात शिरून एकाने चाकूने हल्ला केल्याची घटना सोमवार, 4 जुलै रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी एका संशयीतांविरोधात फैजपूर पोलिस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

मध्यरात्रीच्या सुमारास मारला चाकू
फैजपूर शहरातील आंबेडकर नगरात जहाँगीर शेख शाबीर हे कुटुंबियांसह वास्तव्यास असून मंगळवार, 4 जुलै रोजी किरकोळ कारणावरून गल्लीतील भूषण मुकुंदा मेढे याने मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास घरात सर्वजण झोपलेले असतांना जहाँगीर शेख साबीर यांच्या उजव्या हातावर चाकू मारून दुखापत केली तसेच जहाँगीर शेख यांची वहिनी फरदाना शेख यांच्या कानशीलात लगावली व तुम्हाला सोडणा नाही, असे म्हणत आरोपीने पळ काढला. या प्रकरणी फरदाना शेख उमर यांनी फैजपूर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून संशयीत आरोपी भूषण मुकुंदा मेढे (आंबेडकर नगर, फैजपूर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक अमजद खान अलीशेख पठाण करीत आहे.