फैजपूरात प्लॅस्टीक पिशव्यांचा वापर : व्यावसायीकांना सात हजारांचा दंड

0

मुख्याधिकार्‍यांच्या कारवाईने खळबळ : प्लॅस्टीक न वापरण्याचे आवाहन

फैजपूर : प्लास्टिक बंदी असताना शहरात अनेक लहान-मोठे व्यावसायीक प्लास्टिक पिशवीचा वापर करीत असल्याचे आढळून आल्यानंतर गुरूवारी सायंकाळी मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर करणार्‍या लहान-मोठ्या व्यावसायीकांवर कारवाई करून सात हजारांचा दंड वसूल केल्याने व्यावसायीकांमध्ये खळबळ उडाली आहे.

कारवाईने विक्रेत्यांमध्ये खळबळ
शासनाने प्लास्टिक बंदीसाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती व उपाययोजना सुरू केल्या आहे. त्याच पार्श्वभूमीवर फैजपूर पालिकेनेसुद्धा प्रत्येक व्यावसायीक व नागरीकांपर्यंत जनजागृतीच्या माध्यमातून माहिती दिली आली आहे मात्र काही व्यावसायीक आडमुठेपणा करून सर्रास प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर करीत आहे. गुरूवारी संध्याकाळी मुख्याधिकारी किशोर चव्हाण व प्लस्टिक बंदीचे पथक यांनी अत्यावश्यक सेवा सुरू असणार्‍या व्यावसायीकांकडून कॅरीबॅग वापर करत नाही याची खात्री केली. जे व्यावसायीक कॅरीबॅगचा सर्रास वापर करीत आढळले त्यांच्यावर तत्काळ दंड आकारण्यात आला. गुरुवारी संध्या प्लस्टिक कॅरीबॅग वापरणार्‍या व्यावसायीकांकडून सात हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यावेळी मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका कर निरीक्षक बाजीराव नवले, प्लस्टिक बंदीचे पथक यांनी ही कारवाई केली.

Copy