फैजपूरात पूर्णानंद महाराजांचा असाही प्रताप: छेडखानी केल्याने पोलिसांनी टाकले लॉकअपच्या आत

फैजपूर : प्रवचनकार म्हणून ख्यातील असलेल्या व बर्‍यापैकी भक्तगण जमवलेल्या शहरातील लक्ष्मी नगरातील रहिवासी असलेल्या पूर्णानंद विनायक पाटील उर्फ पूर्णानंद महाराजाने एका अल्पवयीन मुलीची छेडखानी केल्याने पोलिसांनी त्यास कारागृहात टाकले. झाले असे की, धार्मिक क्षेत्रात कार्यरत असणार्‍या पूर्णानंद महाराज नामक विवाहित व्यक्तीने मंगळवारी एका अल्पवयीन मुलीची छेड काढली. अल्पवयीन मुलीच्या आजोबांच्या दुचाकीच्या विक्रीबाबत संशयीत गेल्यानंतर त्याने विनयभंग केल्याचा आरोप आहे. पीडीतेने याबाबत विकृती महाराजांच्या कृत्याची कुटुंबियांना माहिती देताच त्यास चांगलेच चोपून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. अल्पवयीन मुलीच्या पालकांच्या फिर्यादीवरून संशयीताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.निरीक्षक प्रकाश वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे व चेतन महाजन करीत आहेत.

Copy