फैजपूरात दुसर्‍या दिवशीही आढळला कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण

3

फैजपूर : पोलिस ठाण्यातील अधिकार्‍याला कोरोनाची लागण झाल्याच्या घटनेला 24 तास उलटत नाही तोच व्यवसायाने डॉक्टर असलेल्या इसमाला कोरोनाची लागण झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. प्रशासनाने कुरेशी मोहल्ला हा भाग प्रतिबंधक क्षेत्र म्हणून घोषित केला आहे तर या रुग्णाच्या घरापासून एक किमी परीघाच्या क्षेत्रात प्राशासनाकडून प्रतिबंध घालण्यात आले आहे. शुक्रवारी एक पोलिस अधिकारी कोरोनाबाधीत झाल्याने बस स्टँड मागील भाग नम्रता नगर हा भाग प्रशासनातर्फे प्रतिबंधीत करण्यात आला तर नागरीकांनी सतर्क राहून खबरदारी घ्यावी, विनाकारण घराबाहेर पडु नयेख नाकातोंडावर मास्क बांधावे, घरी सुरक्षित रहावे, आपल्यासह कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Copy