फैजपूरात जागतिक साळी फाउंडेशनतर्फे 10 गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप

0

समाजाचं देण लागतो या भावनेतून संस्थेचे कार्य -विजय वक्ते

फैजपूर- शहरात जागतिक साळी फाउंडेशन मुंबईतर्फे शहर तसेच परीसरातील 10 होतकरू व गरजू महिलांना मोफत शिलाई मशीन वाटपाचा कार्यक्रम गुरुवारी पार पडला. यावेळी फाऊंडेशनचे प्रणेते तथा मंत्रालयातील कक्ष अधिकारी विजय वक्ते यांनी आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून ही संस्था कार्य करीत असल्याचे आपल्या मनोगतातून सांगितले.नंदलाल साळी यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला.

कुणीही शिक्षणापासून वंचित राहू नये -विजय वक्ते
फैजपूर येथे आपले प्राथमिक व महाविद्यालयीन शिक्षण घेतलेले विजय वक्ते आज मंत्रालयातील उच्च पदावर कक्ष अधिकारी म्हणून कार्य कार्यरत असून ते म्हणाले की, आर्थिक अडचण व घरची हलाखीची परीस्थिती असलीतरी कुणीही शिक्षण सोडू नये, असे त्यांनी आवाहन करीत शिक्षणाचा पूर्ण खर्च फाउंडेशन करेल. जशी पात्रता तसेच शिक्षण देण्यासाठी संस्था बांधील राहील. विद्यार्थ्यांसाठी पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षांचे मोफत क्लासेस सुरू केले असू त्याचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. सावदा येथील एका विद्यार्थिनीचा आर्थिक अडचणींमुळे न होणारा महाविद्यालयातील प्रवेश त्यांनी करून या कार्याचा शुभारंभ केला.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
अध्यक्षस्थानी भुसावळ येथील अशोक चव्हाण होते. व्यासपीठावर बर्‍हाणपूर साळी समाज अध्यक्ष अशोक सातपुते, गुजर समाजाध्यक्ष चंपालाल सूर्यवंशी, भुसावळ समाजाध्यक्ष राजेंद्र पाटील, महिलाध्यक्ष कविता वाढे, भुसावळ अध्यक्षा माधुरी पाटील, रवींद्र चव्हाण, प्रभाकर सूर्यवंशी यांच्यासह समाजाचे ज्येष्ठ बाबुराव चव्हाण, माजी नगरसेविका सोनाली वाढे, फाऊंडेशनच्या प्रमुख विश्वस्त निशा वक्ते, मयूर चव्हाण यांची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते फैजपूर, सावदा व भुसावळ येथील समाजातील होतकरू व गरजू महिलांना 1 शिलाई मशीन वाटप करण्यात आले. यशस्वीतेसाठी नंदलाल साळी, सुनील रमेश वाढे, बापू वैद्य, मुकेश साळी, तेजेंद्र साळी, चंदू वाढे यासह समाज समाज बांधवांनी परिश्रम घेतले.

Copy