Private Advt

फैजपूरातील व्यापार्‍याला चार लाखांचा गंडा

फैजपूर : शहरातील शिव कॉलनी परीसरात राहणार्‍या व्यापार्‍याला कंपनीची फ्रँचायसी देण्याच्या आमिषाने हैदराबाद येथील दोघांसह जळगावच्या दोघांनी चार लाखात गंडवल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी फैजपूर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात बुधवारी रात्री उशिरा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

शोरूमच्या नावाखाली घातला गंडा
फैजपूरातील व्यापारी मयुर अरुण मंडवाले (28, रा.भुसावळरोड, शिवकॉलनी, फैजपूर) हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहेत. 11 ऑगस्ट 2020 ते आजपर्यंत साईराम बालाजी पाटील, परमेश्वर बालाजी पाटील (दोन्ही रा.हैदराबाद) यांनी मयूर मंडवाले यांना डेनिम कंपनीचे फ्रँचायसी देण्याच्या नावाखाली 45 दिवसात फर्निचर व माल देऊन शोरूम ओपन करून देऊ, असे आश्वास देत मंडवाले यांच्याकडून चार लाखांचा चेक घेतला. त्यानंतर त्यांनी अद्यापपर्यंत कुठल्याही पद्धतीचा शोरूम व माल न दिल्याने व फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने मयूर मंडवाले यांनी फैजपूर पोलिसात धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर संशयीत आरोपी साईराम बालाजी पाटील, परमेश बालाजी पाटील (दोन्ही रा.हैदराबाद), नामदेव ध्रुवकुमार शिंपी (रा.दादावाडी), योगेश रमेश कुलकर्णी (रा.गिरणा टाकी, जळगाव) या चार जणांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल अनिल पाटील करीत आहेत.