Private Advt

फैजपूरातील डॉक्टरांना 25 लाखांची खंडणी मागणारा पसार आरोपी जाळ्यात

0

भुसावळ बाजारपेठ पोलिसांची कामगिरी ; तीन महिन्यांपासून आरोपीचा गुंगारा

भुसावळ- फैजपूरातील डॉक्टरांना 25 लाखांची खंडणी मागणार्‍या व गेल्या तीन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणार्‍या आरोपीस बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. शाम पुनाजी इंगळे (शिव कॉलनी, फैजपूर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. संशयीत आरोपी हा शहरातील यावल रोडवरील डॉ.निलेश महाजन यांच्या दवाखान्यात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

यांनी केली कारवाई
बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय तस्लीम पठाण, गोपनीय शाखेचे छोटू वैद्य यांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आरोपीला फैजपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून दुपारी त्यास अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर करून पोलिस कोठडीची मागणी केली जाणार आहे.