फैजपूरातील खंडोबा देवस्थानातील दानपेटी लांबवली

0

चोर्‍या वाढल्या : युनियन बँकेचेही एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला

फैजपूर : शहरातील यावल रोडवरील जे.टी.महाजन अभियांत्रिकी महाविद्यालय जवळील युनियन बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. 6 रोजी सायंकाळी सहा वाजेपूर्वी ही घटना घडली. दरम्यान, खंडोबा देवस्थानातील दानपेटीदेखील लांबवण्यात आल्याने पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

एटीएम फोडण्याचा प्रयत्नाने खळबळ
यावल रस्त्यावरील युनियन बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी 6 रोजी सायंकाळी 6 वाजे पूर्वी फोडण्याचा प्रयत्न केला मात्र सुदैवाने तो अयशस्वी ठरला मात्र चोरट्यांनी एटीएम तसेच त्यातील सीसीटीव्ही कॅमेर्‍याचेे नुकसान केले. या घटनेप्रकरणी बँकेचे कर्मचारी प्रेरणा सिंग यांनी पोलिसात तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेची माहिती कळताच प्रभारी सहाय्यक निरीक्षक राहुल वाघ, फौजदार रोहिदास ठोंबरे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

खंडोबा देवस्थानातील दानपेटी लांबवली
दुसरीकडे खंडोबा देवस्थानातील महादेव मंदिरातील दानपेटी व पाण्याची मोटार अज्ञात चोरट्यांनी लांबविली. ही घटना 30 मे रोजी घडली मात्र देवस्थानचे मठाधीपती महामंडलेश्वर पुरुषोत्तम दास महाराज हे मध्य प्रदेशात असल्याने त्यांच्याशी संपर्क झाल्यानंतर 6 रोजी मंदिरातील सेवेकरी पवन कुमार यादव यांनी पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. चोरट्यांनी दानपेटीतील चार हजार रुपये व दोन हजार किंमतीची पाण्याची मोटर असा एकूण सहा हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तपास हेड कॉन्स्टेबल इक्बाल सय्यद करीत आहे.-ीींंरलहाशपीीं रीशर

Copy