फैजपूरला दिव्यांग सेनेच्या वतीने जागतिक अपंग दिन उत्साहात साजरा

0

फैजपूर- दिव्यांग सेनेच्या वतीने महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली श्रीराम पेठमध्ये जागतिक अपंग दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात महामंडलेश्वर जनार्दन महाराज व प्रांतधिकारी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आलाी. प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले, जिल्हा दुध संघाचे संचालक हेमराज चौधरी, सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम, मंडळाधिकारी भंगाळे, तलाठी, तसेच फैजपूर दिव्यांग सेना शहराध्यक्ष नितीन महाजन, उपाध्यक्ष नाना मोची, ललित वाघुळदे, सचिव मुन्ना चौधरी, सदस्य राहुल कोल्हे, गणेश भारंबे, संजय वानखेडे, जितेंद्र मेढे, वैभव मेढे, चेतन तळेले, मनोज होले, उमेश चौधरी, देवेंद्र झोपे, संजय रल सावदा येथील दिव्यांग सेना अध्यक्ष विशाल कासार व पदाधिकारी यांची उपस्थिती होती. महामंडलेश्वर जनार्दन महाराज म्हणाले की, दिव्यांग ही एकप्रकारे दिव्यशक्ति आहे त्यामुळे आपण कोणताही न्यूनगंड मनात बाळगु नये. आज देशात सर्वाधिक स्थान आपल्या दिव्यांग बांधवांना दिली जाते ही आपल्या साठी एक आनंदाची बाब आहे.

लोकसेवक मधुकरराव चौधरी महाविद्यालय
लोकसेवक मधुकरराव चौधरी औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय अपंगत्व दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.आर.पाटील यांनी महाविद्यालयातील अपंग विद्यार्थी कल्पेश भामरे विद्यार्थिनी जयश्री सुरवाडे, अश्विनी दुते यांना प्रोत्साहनपर भेट वस्तू देऊन मार्गदर्शन केले. उपप्राचार्य डॉ.आर.वाय.चौधरी, डॉ.ए.पी.पाटील, प्रा.महेश नेमाडे, प्रा.मिलिंद चौधरी, प्रा.व्ही.एल.फिरके, मयूर नारखेडे व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी प्रतिनिधी व विद्यार्थी-विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती.

Copy