फैजपूरचे नगरसेवक शेख कुर्बान यांच्याकडून गरजूंना शिरखुर्म्याचे वाटप

0

फैजपूर : जगासह भारतातही कोरोना प्रादुर्भावाने थैमान घातले असून महाराष्ट्रातही संक्रमित रुग्णांची संख्या अधिक आढळून येत असल्याने संपूर्ण देशासह महाराष्ट्रातही लॉकडाऊन करण्यात आले असताना दुसरीकडे मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे. हातावर पोट असणार्‍या गोर-गरीब नागरीरकांवर उपासमारीची वेळ येवून ठेपली असून येथील नगरसेवक शेख कुर्बान यांनी शहरातील तहानगर, पठाणवाडी, इस्लामपूरा हजीरा मोहल्ला, मिल्लत नगर भागातील 200 गरजूंना प्रत्येकी 500 रुपये व उत्तम दर्जाचे शिरखुर्मा किटचे वाटप केले. यंदाची ईद मुस्लिम बांधवांनी घरीच राहून साजरी करावी व प्रशासनाला सहकार्य करावे तसेच शहरातील गरजू नागरीकांना काही आर्थिक मदत लागल्यास सहकार्य केले जाईल, असे आश्वासन शेख कुर्बान यांनी दिले.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश वानखडे, मुख्याधिकारी किशोर चव्हाण, जिल्हा दुध संघ संचालक तथा जेष्ठ नगरसेवक हेमराज चौधरी आदी उपस्थित होते.

Copy